औरंगाबाद- शहरातील एमजीएम महाविद्यालयात फिजीओथेरपीचे शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय तरुणीचा वसतिगृहातच खुन झाला, चार दिवस झाले तरी पोलिसांना या प्रकरणाच धागेदोरे लागले नाहीत. शुक्रवारी (ता.१४) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने एमजीएम फिजियोथेरपी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना निवेदन देऊन, आकांक्षा खून प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
एमजीएमच्या गंगा वस्तीगृहात आकांक्षाचा गळा
दाबून खून होतो कसा ? प्रशासन सुरक्षेच्या बाबतीत इतके
अनभिज्ञ कसे असू शकते ? चार दिवसानंतर हि खुनाचा तपास का लागत
नाही ? आपल्या प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळेच
हा खून झाला आहे. असे अनेक प्रश्न
निवेदनाद्वारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने एमजीएम फिजियोथेरपी
महाविद्यालयाच्या प्राचार्यांना केले आहेत. या प्रकरणाची CID मार्फत चौकशी करण्यात यावी अन्यथा
एमजीएम प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे अखिल भारतीय विद्यार्थी
परिषदेने सांगितले आहे. याप्रकरणी पोलिस
आयुक्तांना भेटून आपण निवेदन देणार आहोत असे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने
सांजवार्ता ऑनलाईनशी बोलताना सांगितले आहे.















